Video Satara: महायुतीमधील वाद चव्हाट्यावर; Jaykumar Gore यांचं राष्ट्रवादीच्या निंबाळकरांना थेट आव्हान! काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

Maharashtra Politics: साताऱ्यात महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं सध्या दिसून येत आहे. भाजपचे जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या निंबाळकरांना थेट आव्हान दिलं आहे.

रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जर जातिवंत राजे असाल तर, मैदानात येऊन लढाई करा असं थेट आव्हान भाजपच्या जयकुमार गोरे यांनी निंबाळकरांना दिलं आहे. यावरुन स्पष्ट दिसून आलंय की, महायुतीमधील वाद अता चव्हाट्यावर आला आहे. गोरे म्हणाले, तुम्ही गेम कसला करत आहात, शरद पवारांना काय भेटता, एका पक्षात असताना दुसऱ्यांचं काम करतात असा थेट हल्लाबोल गोरेंनी निंबाळकरांवर केला आहे. दरम्यान आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केलीये. त्यामध्ये आता महायुतीतील वाद समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com