Jalna Video: जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून ST बसवर दगडफेक! पण कशासाठी?

Jalna ST Bus New: जालन्यात एसटी बसवर दगडफेक, दगडफेकीच्या घटनेनं खळबळ, बीडकडे जाणाऱ्या एसटीवर दगडफेक

जालना : जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून बसवर दगडफेक करण्यात आली आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर जवळ बसची तोडफोड करण्यात आली. MH 20 बी.एल.1116 हि बस छत्रपती संभाजी नगर हून बीडकडे जात असताना या बसवर दगडफेक करण्यात आली. चार ते पाच अज्ञातांनी महाकाळा शिवाजीनगर जवळ बसची तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बसचं नुकसान झालं आहे. दरम्यान, दगडफेक करण्यांचा हेतू नेमका काय होता? ही दगडफेक कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र य दगडफेकीत एसटी बसचं नुकसान झालंय. तर दगडफेकीच्या घटनेनं एसटी बसमधील चालक आणि वाहकासह प्रवाशांचाही एकच गोंधळ उडाला होता. या एसटी बसमध्ये 32 प्रवासी होते. दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. मात्र एसटी बसच्या समोरील काचेचं मोठं नुकसान झालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com