Jalna Scam : जालन्यात 26 तलाठ्यांचा काळा कारनामा, तब्बल ३५ कोटी हडपले | VIDEO

Jalna 35 crore scam final report details : जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात तब्बल ३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला आहे. २६ तलाठ्यांसह इतर कर्मचाऱ्यांवर आरोप झाले.
Summary

Jalna Scam News : जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. जिल्ह्यात 34 कोटी 97 लाख रुपयांच्या रक्कमेचा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या तपासात समोर आलं आहे. समितीच्या तपासात 26 कर्मचारी हे दोषी आढळले असून अंबड तालुक्यातील 15 तर घनसावंगी तालुक्यातील 11 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. दरम्यान, या 34 कोटी 97 लाख रुपयांपैकी आता पर्यंत एकूण 5 कोटी 74 लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.

जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी 8 सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर समितीने आपला अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. या प्रकरणी चौकशी समितीने 79 कोटींची रक्कम अक्षेपित काढली होती. त्यापैकी 72 कोटी रुपयांची समितीने चौकशी केली असून 34 कोटी 97 लाख रुपयांची रक्कम अपहारीत असल्याचं या चौकशीत निष्पन्न झालं असल्याची माहिती जालना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com