Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेस अपघात प्रकरण; चहावल्याची अफवा अन् १३ जणांचा मृत्यू, चहावाला मात्र फरार | Video

Jalgaon Railway Accident : जळगाव पुष्पक रेल्वे अपघात प्रकरणात आग लागल्याची अफवा पसरवणारा चहावाला आता फरार झालेला आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

जळगाव पुष्पक रेल्वे अपघात प्रकरणात आग लागल्याची अफवा पसरवणारा चहावाला आता फरार झालेला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचे जबाब नोंदविल्यानंतर आग लागल्याची अफवा एका चहावल्याने पसरवली असल्याचं समोर आलं आहे.

आग लागली, याची बोंब ठोकल्यामुळे एकाने रेल्वे बोगीतील चेन ओढली आणि रेल्वे थांबताच प्रवाशांनी उड्या घेतल्या. त्यामुळे १२ जणांचा समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला, या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा पोहोचली आहे. त्यामुळे अफवा पसरवणारा रेल्वेतील चहा विक्रेता आता चौकशीच्या रडारवर आहे. पुष्पक एक्स्प्रेस जळगाव स्थानकावरून पाचोऱ्याकडे निघाली. तेव्हा काहीसा धूर निघत असल्याचे चहा विक्रेत्याने पाहिले. त्यानंतर त्याने आग लागल्याची बोंब ठोकली. त्यामुळे जनरल बोगीतील प्रवासी घाबरले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, अपघात होण्याच्या काही सेकंदापूर्वीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यात आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवासी रेल्वेतून खाली उतरताना दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांची गर्दी झालेली असतानाच समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत असल्याचा रेल्वेचा हॉर्न व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. त्यानंतर एकच गोंधळ झालेला या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com