इस्रोच्या अवकाश प्रवासात एक ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. 'बाहुबली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3 रॉकेटने पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. 'इसरोनं तयार केलेल्या बाहुबली म्हणजेच एलव्ही एम थ्री या शक्तिशाली रॉकेटने उपग्रहाला त्याच्या कक्षेपर्यंत यशस्वीपणे प्रक्षेपित केलं.' या यशस्वी प्रक्षेपणामुळे, भारत आता जड उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी पूर्णपणे आत्मनिर्भर झाला आहे.
तब्बल ६४० टन वजनाचे आणि साडे त्रेचाळीस मीटर उंचीचे हे महाकाय रॉकेट भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या रॉकेटच्या यशस्वी कामगिरीमुळे केवळ व्यावसायिक प्रक्षेपणाचे दरवाजे उघडले नाहीत, तर भविष्यातील चंद्र आणि मानवरहित मोहिमांसाठी ही एक भक्कम पाया रचला गेला आहे. याला 'बाहुबली' हे नाव त्याच्या प्रचंड शक्ती आणि वजन उचलण्याच्या क्षमतेमुळे दिले गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.