Iran Israel Tension: अमेरिका अन् इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण चवताळला; तेल अविवसह अनेक शहारात हल्ले|VIDEO

Iran Rocket Attack On Tel Aviv And Jerusalem Explained: अमेरिकेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्त्रायलमधील तेल अवीव, यरुशलेमवर रॉकेट हल्ले केले. यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, युद्धजन्य परिस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेच्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणनं थेट इस्त्रायलवर जोरदार पलटवार केला आहे. इराणकडून तेल अवीव, यरुशलेमसह इस्त्रायलच्या अनेक प्रमुख शहरांवर रॉकेट हल्ले करण्यात आले असून, यामुळे संपूर्ण इस्त्रायलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ल्याच्या ठिकाणी जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तेल अवीव आणि यरुशलेम शहरांमध्ये सतत हवाई अलर्ट जारी करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक धोकादायक वळणावर गेला आहे. इराणकडून मिळालेल्या प्रतिक्रियेत हा हल्ला अमेरिकेच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आल्याचं म्हटलं जातं. दरम्यान, इस्त्रायलच्या संरक्षण दलांनीही तातडीने प्रतिउत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत असून, संयुक्त राष्ट्रसंघाने संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. पुढील काही तास आणि दिवस हे संपूर्ण मध्यपूर्वसाठी निर्णायक ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com