Fact Check : 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Iintent ban viral mesage : उद्या जगभरात इंटरनेट बंद होणार आहे...? पुन्हा एकदा ऐका...उद्या इंटरनेट बंद होणार आहे...हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना...? त्याचं कारणही तसंच आहे...उद्या इंटरनेट बंद होणार असल्याचा दावा एका व्यक्तीने केलाय...मात्र, हे खरं आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

एका व्हिडिओतून दावा करण्यात आलाय...की 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार...? खरंच इंटरनेट बंद होणार आहे का...? 'द सिम्पसन्स' कार्टूनची भविष्यवाणी खरी ठरणार का...?

इंटरनेट बंद होणार हा दावा ऐकूनच सगळ्यांना धक्का बसला असेल...कारण, इंटरनेट बंद म्हणजे आजच्या घडीला करोडो फोन्स, कंपन्यांचं काम, सगळंच ठप्प...'द सिम्पसन्स' कार्टूनने 16 तारखेला जगभरातील इंटरनेट बंद होण्याची भविष्यवाणी केलीय असा दावा या व्यक्तीने केलाय...या व्हिडिओत एक शार्क समुद्राखाली जाणाऱ्या इंटरनेट केबल्स खात असल्याचं दाखवण्यात आलंय...त्यामुळे हे खरं आहे का...? असं होणार आहे का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण सध्या इंटरनेट ही काळाची गरज झालीय...इंटरनेट नसेल तर जीव गुदमरल्यासारखा होतो...चॅटिंग, इन्स्टा, फोटो शेअर हे सगळं इंटरनेटवर अवलंबून असतं...त्यामुळे याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने सायबर एक्स्पर्टचा सल्ला घेतला.

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

16 तारखेला इंटरनेट बंद होणार ही अफवा

ट्रम्प यांच्या शपथविधीची वेळ साधून अफवा पसरवली

मीम्स बनवून लाईक्स मिळवण्याचा हेतू

समुद्राच्या तळाशी अनेक केबल्स असतात

इंटरनेट हॅक झाल्यास बॅकअप कनेक्शन असतं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे...त्यामुळेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा व्हिडिओतून दावा केला...मात्र आमच्या पडताळणीत 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com