Cricket Team Fan News : भारतीय क्रिकेट टीमच्या फॅन्सची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल

मुंबईत इंडियन क्रिकेट टीमच्या मिरवणुकीत सामील झालेल्या चाहत्यांची तब्येत बिघडली आहे. काहींना श्वास घ्यायला त्रास होतोय तर एकाचा फ्रॅक्चर झाले आहे.

मुंबईत भारतीय क्रिकेट टीमची मिरवणूक काढण्यात आली होती. आणि या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी हजेरी लावली होती. पण गर्दीत अनेक फॅन्संना दुखापत झाली आहे. काहींना श्वास घ्यायला त्रास होतोय तर काहींना फ्रॅक्चर झाले आहे. मुंबईत आपल्या आवडत्या क्रिकेटर्संना पाहण्यासाठी आणि चीअर करण्यासाठी फॅन्संनी हजेरी लावली होती. पण या गर्दीत अनेकांची तब्येत खालावली. एका तरुणाचा श्वास घ्यायला त्रास होत असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला खांद्यावर नेऊन रुग्णालयात दाखल केले होते. एकाला फ्रॅक्चर झाले असून १० जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com