संचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील डाक विभागाने अमेरिकेकडे जाणाऱ्या सर्व टपाल वस्तू २५ ऑगस्टपासून तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकन सरकारच्या कार्यकारी आदेशामुळे घेण्यात आला असून, त्यानुसार २९ ऑगस्टपासून ८०० डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंवरील करमुक्त सवलत मागे घेतली जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेकडे पाठविल्या जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर आता देशनिहाय सीमाशुल्क आकारले जाणार आहे. तथापि, १०० डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तूंना करमुक्ती कायम राहणार आहे.
डाक विभागाने स्पष्ट केले आहे की, ही परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित घटकांच्या समन्वयाने सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ज्यांनी आधीच अशा वस्तू बुक केल्या असून त्या अमेरिकेकडे पाठवता येणार नाहीत, त्यांना पोस्टेजचा परतावा मिळणार आहे. ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल डाक विभागाने खेद व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.