Yoga Day : ११वा आंतरराष्ट्रीय योग उत्साहात साजरा, PM Modi यांनी विशाखापट्टणममध्ये केली योगसाधना | VIDEO

PM Modi Leads Yoga Day Celebrations in Visakhapatnam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे योगसाधना केली. देशभरात तब्बल ११ लाखांहून अधिक ठिकाणी योग कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत.

आज २१ जून रोजी देशभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. "एक पृथ्वी, एक आरोग्य" या संकल्पनेवर आधारित यंदाच्या योग दिनासाठी देशभरात तब्बल ११ लाखांहून अधिक ठिकाणी कार्यक्रम नोंदवले गेले आहेत. देशातील विविध शाळा, महाविद्यालयं, संस्था, सरकारी कार्यालये, संरक्षण दल आणि स्वयंसेवी संस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नागरिकांसमवेत योगसाधना करत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला आहे. त्यांनी योगाच्या माध्यमातून शरीर आणि मनाच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. यासोबतच जगभरातील भारतीय दूतावास आणि सांस्कृतिक केंद्रांनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करत योगाचा जागतिक प्रचार व प्रसार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com