PM Narendra Modi Speech Record : पीएम मोदींचा स्वातंत्र्यदिनी नवा विक्रम; लाल किल्ल्यावरून केलं लांबलचक भाषण, VIDEO
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लांबलचक भाषण करण्याचा त्यांचाच विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित करताना दीड तासांहून अधिक वेळ भाषण केलं. मोदींनी तब्बल ९४ मिनिटे भाषण केलं. या भाषणात विविध मुद्दे मांडले.
मोदींनी भाषणात देशात सेक्युलर सिव्हिल कोड असावं, असेही त्यांनी म्हटलं. यानंतर तेव्हाच धर्माच्या आधारावरील भेदभाव मिटेल, असं त्यांनी म्हटलं. बांगलादेशातील घटनेचा त्यांनी उल्लेख केला. भाषणानंतर मोदींनी उपस्थित अधिकारी आणि सैनिकांना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदींनी २०१४ साली त्यांनी ८२ मिनिटे भाषण केलं.२०१७ साली त्यांनी ९४ मिनिटांचं भाषण केलं. आता २०२४ साली ९४ मिनिटांच्या वर भाषण केलं. या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.