Maharashtra Politics: लक्ष राहू द्या आमच्यावर' अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांना मिश्कील टोला|VIDEO

Battle for Sugar Mill: इंदापूर तालुक्यात आज साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे, यावेळी शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट झाली.

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. छत्रपती हायस्कूल येथे 'ब वर्ग' मतदारांसाठीच्या केंद्रावर अनेक दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

यंदा ही निवडणूक जय भवानी पॅनल विरुद्ध शेतकरी बचाव पॅनल अशा स्वरूपात रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी पॅनल तर भाजपचे नेते तानाजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनल रिंगणात उतरले आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भाजप असा थेट सामना ठरत आहे.

विशेष म्हणजे, मतदानादरम्यान अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची छत्रपती हायस्कूल केंद्रावर एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली. या भेटीबाबत विचारले असता हर्षवर्धन पाटील म्हणाले, आमची तर नेहमीच भेट होते. अजितदादा आले आणि म्हणाले, आमच्या पॅनलला मतदान करा. मी त्यांना उत्तर दिलं, आमचं आणि तुमचं काय? हे तर शेतकऱ्यांचं पॅनल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com