Video: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; Rohit Pawar यांनी घेतला सहभाग

MPSC Student Protest: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनात कालपासून रोहित पवार यांनी देखील सहभाग घेतलाय. विविध मागण्यासांठी विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. तसेच आज होणाऱ्या MPSC आयोगाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु आहे. अनेक मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आता रोहित पवारांनी देखील सहभाग घेतलाय. दरम्यान यावेळी ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, कालच हा निर्णय व्हायला हवा होता. विद्यार्थ्यांच्या मनात रोष आहे. आज एमपीएससीच्या आयोगाची बैठक आहे,तर आज निर्णय व्हायला हवाय. या लढा आधीपासून सुरु असून आम्ही पाठिंबा देत आहोत. असं रोहित पवार म्हणाले.तसेच आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com