वो तो बच्चा है..! माजी मंत्री-भाजप आमदारामध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

Satej Patil vs Rahul Awade : महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात सगळ्याच पक्षांनी दंड थोपटले आहेत. इचलकरंजीत माजी मंत्री सतेज पाटील आणि भाजपचे आमदार राहुल आवाडे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.

इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीवरून काँग्रेस आणि महायुतीमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय. इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्यावर टीका करताना वो तो बच्चा है, असं म्हणत सतेज पाटलांनी खिल्ली उडवली. तर मी बच्चा आहे की कोण, हे तुम्हाला या निवडणुकीत इचलकरंजीकर दाखवतील असं आव्हान आवाडेंनी दिलंय.

राहुल आवाडे अजून लहान आहेत. त्यांना काय बोलायचं हे कळत नसेल. फार त्यांच्यावर बोलायची आवश्यकता आहे असं वाटत नाही. वर्षभर सत्ता आहे. महायुती आहे. मग इचलकरंजीचा पाणीप्रश्न सुटत नाही. महापालिका निवडणुका आहेत हे माहीत होतं ना. मग वर्षभरात करून दाखवायचं होतं, असं पाटील म्हणाले.

त्यावर राहुल आवाडे यांनी उत्तर दिलं आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. हा बच्चा आहे की काय आहे हे कळेल. बच्चा कसा यांना भारी पडेल, हे इचलकरंजीचे लोक यांना दाखवून देतील, असे आवाडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com