Helicopter Emergency landing: मोठा अपघात टळला! हवेतच टेक्निकल फॉल्ट, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, VIDEO

Indian Air Force: भारतीय हवाई दलाच्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आणीबाणीची लँडिंग करण्यात आली. या तात्काळ निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

उत्तरप्रदेश: हवाई दलाच्या लढाऊ हेलिकॉप्टरचं अपघात होता होता टळला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. भारतीय हवाई दलाचं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचं तांत्रिक बिघाडामुळं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. चिलकाना परिसरातील जोधेबांस गावाजवळ हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सरसावा हवाई तळावरून नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरनं उड्डाण भरलं होतं. उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. दोन्ही पायलटनं तात्काळ निर्णय घेतला आणि हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या एका शेतात उतरवलं. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर शेतात उतरवल्यामुळं ग्रामस्थांनी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सुरक्षिततेच्या कारणामुळं लष्कराचे जवान आणि पोलिसांनी गर्दी पांगवली. काही ग्रामस्थांनी मोबाइलवरून व्हिडिओ आणि फोटो काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्या ठिकाणावरून हटवण्यात आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तिथे पोहोचले. लष्कराच्या तांत्रिक पथकाने हेलिकॉप्टरची तपासणी केली. हेलिकॉप्टरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com