Atul Save News: "पालकमंत्री पद दिलं तर भूषवायला आवडेल!", अतुल सावेंच्या वक्तव्याची चर्चा...

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, मागल त्याला सौर पंप, शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठा,15 हजर कोटीचा प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहे असंही अतुल सावे पत्रकार परिषदेत म्हणालेत.

Atul Save News: आम्हाला पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली तर आम्ही करणार. नाहीतर आमचं काम असंही चालूच आहे असं वक्तव्य अतुल सावेंनी केलंय. जर आमचं पालकमंत्री पद असतं तर आम्ही भांडून घेतलं असतं असंही ते म्हणालेत. याचबरोबर संजय राऊत आतापर्यंत जेवढे बोलले त्यापैकी 99% निर्णय त्यांचे खोटे ठरलेले आहेत असंही ते म्हणालेत. रोज सकाळी उठायचं आणि नऊ वाजता टीव्हीवर बोलायचं. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर जास्त बोलणार नाही अशी टीका अतुल सावेंनी संजय राऊतांवर केलीय. पत्रकार परिषदेत बोलताना आम्हाला पालकमंत्री पद दिलं तर शंभर टक्के भूषवायला आवडेल असं अतुल सावे म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com