VIDEO: ...तर पश्चातापाची वेळ आली नसती; अजित पवारांच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांचा निशाणा
Vijay Wadettiwar on Ajit Pawar : घरात फूट पाडू नका, त्या अनुभवातून मी गेलो आहे. मी चूक केली आहे. तुम्ही करू नका, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे केलं. अजित पवार यांनी शरद पवारांचं नाव घेतलं नसलं तरी, त्यांनी चूक केली अशी अप्रत्यक्ष कबुली दिली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीकास्त्र सोडलं. तर विजय वडेट्टीवार यांनीही खोचक टोला लगावला.
अजित पवार यांच्याशी अलीकडे काही बोलणं झालं नाही. ते पश्चातापाच्या मूडमध्ये आहेत की नाहीत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं त्यांनी तिथं जाऊन सल्ला दिल्याचं काम केल्याचं दिसतंय, असं जयंत पाटील म्हणाले.
तर, ही सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मजबूत झाली असती, तर ही पश्चातापाची वेळ अजित पवार यांच्यावर आली नसती, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.