Hingoli: हिंगोलीत भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!

Hingoli Earthquake News: भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरलं आहे.नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हिंगोली: हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. गणेशवाडी भागातील नागरिक सकाळी 7 वाजल्यापासून घराच्या बाहेर थांबले आहे.नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सकाळी सुमारे 7.15 च्या सुमारास भूकंपाचा हादरा बसला आहे.यापूर्वी देखील असेच भूकंपाचे धक्के हिंगोलीत जाणवले होते,परंतु यावेळचे भूकंपाचे धक्के हे आधीपेक्षा जास्त तीव्र असल्याचे नागरिकांकडून बोललं जात आहे.दोनवेळा हिंगोलीत भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये अधिक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com