आसाममध्ये पुन्हा NDA सरकार; हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ,VIDEO

himanta biswa sarma cm oath ceremony : आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ धेतली. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते.
Summary

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात 'एनडीए'ने बाजी मारली. 'एनडीए'च्या विजयानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला. यावेळी रामेश्वर तेली यांनी भाजपच्या नेतृत्वात असलेल्या एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री शपथ घेतली. हिमंत बिस्वा सरमा यांच्यासहित ४ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा मतदारांनी सत्तास्थापनेसाठी कौल दिला. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर हिमंत बिस्वा सरमा यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. आसाममध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे. या निकालाने लोकांचा भाजपवर विश्वास असल्याचे दिसून आल्याचेही हिमंत यांनी सांगितले.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com