VIDEO: Uttarakhand ला मुसळधार पावसाने झोडपलं, शेकडो वाहनं पाण्यात

Uttarakhand Rain News: उत्तराखंडमध्ये जोरदार पावसाचे आगमन, पहिल्याच पावसात संपूर्ण उत्तराखंड जलमय.

उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पहिल्याच पावसात संपूर्ण उत्तराखंड जलमय झालं आहे. राज्यामध्ये सुरु असलेल्या पावसामुळे हरिद्वारमध्ये सर्वीकडे पाणी साचलं आहे. या पाण्यामध्ये अनेक वाहने वाहून गेली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरिद्वार मधील सुखी नदी दुथडी भरुन वाहत आहे. याच नदीमध्ये अनेक वाहने वाहून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com