VIDEO: Navi Mumbai मध्ये पावसाचं थैमान, IT पार्कला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणीचं पाणी

Navi Mumbai MIDC Rain News: मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील MIDC मधील रस्ते जलमय, चाकरमान्यांना वाहनातून प्रवार करताना करावी लागतेय तारेवरची कसरत.

मुसळधार पावसाचा तडाखा आता नवी मुंबईलादेखील बसताना पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील MIDC मधील रस्ते जलमय झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना वाहनातून प्रवार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, डोंबिवली, पालघर, कल्याण अशा भागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. तर आता नवी मुंबई मध्ये देखील तीच परिस्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. जलमय रस्त्यावर महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी हजर असलेले पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com