Video: कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

पुणे, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर याठिकाणी मुसळधार पाऊस असणारे, याठिकाणांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

Konkan Rain News: कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. उद्या (ता. २६) कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वायव्य मध्य प्रदेशात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली राजस्थान आणि गुजरातकडे सरकताना आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे काल रविवारी (ता. २५) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशाकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. पुणे परिसरात मध्यम ते जोरदार कोसळणार. पुणे, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर याठिकाणी मुसळधार पाऊस असणारे, याठिकाणांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, पालघर, धुळे, जळगावला येलो अलर्ट देण्यात आलाय. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर विजांसह पाऊस (येलो अलर्ट) असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com