VIDEO: Sindhudurg जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पुरपरीस्थिती आटोक्यात
कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊन येथील जनजीवन विस्कळीत झालं होतं. परंतु रात्री पासून पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्यामुळे पुरपरीस्थिती नियंत्रणात येत आहे. काल सायंकाळपासून मुंबई गोवा महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्याच्या मुख्य नद्या धोका पातळीवर वाहत आहेत, तर काही सकल भागात अद्यापही मोठ्याप्रमाणात पाणी साचलेलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.