Solapur News : नदीच्या पुरात अडकली ॲम्बुलन्स

Flood In Chandani River : सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चांदणी नदीला पूर आला आहे.

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या चांदणी नदीला पूर आला आहे. येथे असलेल्या पूलावरून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास आगळगांव भागातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे पाणी साठले आहे. या भागात असलेल्या चांदणी नदीला या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना जीव धोक्यात टाकून या नदीवरील पूलावरून प्रवास करावा लागत आहे. हा आगळगाव - उंबरगे पूल ओलांडता येत नसल्याने येथे एक ॲम्बुलन्स देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे. ॲम्बुलन्समध्ये पेशंट महिलेला उपचारासाठी बार्शीला घेऊन जातं असताना ही ॲम्बुलन्स पूलावरील पाण्यात अडकली आहे. त्यामुळे रुग्णांचे देखील हाल होताना दिसत आहेत. दरम्यान, पावसाचा जोर असाच राहिल्यास या परिसरातील गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com