Pune Rain: पुणे जिल्ह्यात पावसाचा कहर! चक्क पूलच वाहून गेला, ११ गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Dimbhe Dam Area Hit by Torrential Rain: पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले असून सुरुवातीच्या दरम्यानच डिंभे धरण भरल्याने माळीण येथील चक्क पुलच वाहून गेला आहे. यामुळे तब्बल अकरा गावांचा संपर्क तुटला आहे.

पुणे जिल्ह्यातील डिंभे धरण आणि माळीण परिसरात शनिवारी मुसळधार पावसाने जोर धरला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे माळीणकडे जाणारा मुख्य मार्ग पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे.

या पावसामुळे माळीण परिसरातील तब्बल ११ गावांचा संपर्क तुटला आहे. डिंभे धरणाच्या खाली नव्याने सुरू असलेल्या पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने, त्या ठिकाणी तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र, पावसामुळे हा पर्यायी मार्गही पाण्याखाली गेला असून माळीणकडे जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची हालचाल पूर्णतः ठप्प झाली आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कृपया धोकादायक पाण्यांतून प्रवास करू नये. पावसाचा जोर लक्षात घेता स्थानिक प्रशासन सतर्क असून मदत आणि बचाव पथकांनी तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com