Rain News : राज्यात पावसाचा अलर्ट; कुठे होणार सर्वाधिक पाऊस ?

Heavy Rain In Kokan : कोकण आणि घाटमाथ्याला हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक भागात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

कोकण आणि घाटमाथ्याला हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पुढचे 24 तास येलो अलर्ट देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हवामान खात्याने अती मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सर्व सुरक्षित काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हा ऑरेंज अलर्ट पुणे, सातारा, कोल्हापूर याठिकाणी देखील देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्राला पुढच्या 24 तासांसाठी येलो अलर्टची घोषणा हवामान खात्याने केली आहे. दरम्यान, यातल्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे सगळीकडे पाणी साठून नगरिकांचे हाल होताना दिसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com