Plastic Tea Cup: टपरीवर चहा पिताय? सावधान! चहाप्रेमींना कॅन्सरचा धोका?

Cancer Risk Due To Plastic Cup: तुम्ही चहाच्या टपरीवर पांढऱ्या शुभ्र कागदी कपात चहा पिताय? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

चहासोबत बिस्कीट किंवा इतर पदार्थ खाण्याची अनेकांना सवय असते. मात्र जर तुम्ही चहासोबत प्लॅस्टिक खाताय असं म्हटलं तर तुम्हाला जरा विचित्र वाटेल पण हे खरंय जर तुम्ही चहाच्या टपरीवर युज अँण्ड थ्रो कपातून चहा पित असाल तर तुम्ही चहासोबत प्लॅस्टिक खाताय. कारण टपरीवर चहा देण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कागदी कपच्या आतील प्लास्टिकचं आवरण गरम चहासोबत थेट पोटात जातं. नेमकं हे कसं घडतं पाहूया.

चहाची तलफ कॅन्सरला आमंत्रण

कागदी कपाला बीपीए केमिकलचं आवरण

गरम चहामुळे प्लॅस्टिक वितळतं

एका कपातून 25 हजार प्लॅस्टिक मायक्रॉन पोटात जातात

बीपीए केमिकलमुळे कॅन्सरचा धोक

Plastic Tea Cup
Weight Loss: नवीन वर्षात फार्मा क्षेत्रात मोठे विस्तार, वजन कमी करणारी गोळी होणार उपलब्ध

चहाच्या कपातून नागरिकांना कॅन्सरचा धोका होत असल्यानं बुलढाण्यातील आझाद हिंद संघटनेनं या कपांवर बंदीची मागणी केली होती. आणि आता या चहाच्या कपांवर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे आदेश जारी करत बुलढाण्यात या कपांवर बंदी घातली आहे. वापरायला सोप्पे आणि युज अँण्ड थ्रो असणारे हे कप न कळत आपल्याला गंभीर आजाराच्या दिशेनं नेत असतात. कॅन्सर पसरवणाऱ्या य़ा कपावर आता कडक कारवाई होणं गरजेचं असून बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला या निर्णयाची राज्यभरात अंमलबजावणी होण्याची नितांत गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com