VIDEO : 'अजित पवार शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही', Hasan Mushrif याचं मोठं वक्तव्य

Hasan Mushrif On Ajit Pawar : अर्थमंत्री आहेत तो पर्यंत अजित पवार शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत, त्याचा या महामार्गाला विरोध आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्ती मार्ग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तो भक्ती मार्ग रद्द व्हावा यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. काही ठिकाणी या विरोधात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुद्धा पुकारलं आहे. भक्ती मार्ग व्हावा ही मागणी नसताना शासनाने भक्ती मार्ग करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील असंख्य शेतकरी अनेक दिवसापासून विविध आंदोलने करीत आहेत.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक मोठी माहिती दिली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे, अर्थमंत्री आहेत तो पर्यंत दादा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत, अस विधान मुश्रीफांनी केलं आहे.'अजितदादांनी स्पष्टपणे सांगितल आहे की शेतकऱ्यांच्या विरोध असेल तर हा प्रकल्प लादणार नाही' असंही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com