VIDEO : महायुतीवर गंभीर आरोप अन् इंदापूरचं नाराजीनाट्य !

Harshwardhan Patil : पक्षप्रवेशाआधीच हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

महायुतीने सत्तेचा गैरवापर केला आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधीच हर्षवर्धन पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. सोमवारी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेण्याआधीच भाजप आणि महायुती सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. महायुती सरकारकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. गेल्या आठ दहा वर्षात इंदापूरचा विकास सगळ्याच स्तरांवर खुंटला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं पाटील यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, एकीकडे हर्षवर्धन पाटील ही टीका करत असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाचे इंदापूरचे स्थानिक नेते भरत शहा हे या पक्ष प्रवेशाने नाराज असल्याची चर्चा असल्याने खासदार सुप्रिया सुळे या भरत शहा यांच्या घरी त्यांची समजूत काढण्यासाठी गेल्या असल्याच समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीचं नाट्य बघायला मिळालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com