Video: जिल्हा परिषदेत प्रहार, अपंग संघटनेचं आंदोलन

जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये दिव्यांगाच्या विशेष शाळेतील प्रतिनियुक्त कर्मचारी कार्यमुक्त करून संबंधित शाळांमध्ये वर्ग करावे

Prahar Pune News: प्रहार अपंग क्रांती च्या वतीने जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात आलाय. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोरील रस्ता दिव्यांग बांधवांनी अडवलाय. पुणे जिल्हा परिषद दिव्यांग विभागामधील रिक्त असलेल्या सहाय्यक सल्लागार पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी आहे. औंधमध्ये सुरू असलेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन इमारत बांधकाम प्रक्रियेतील अनियमित्ततेनंतर पुढील रक्कम ठेकेदारला देण्यात येऊ नये. जिल्हा समाज कल्याण कार्यालयामध्ये दिव्यांगाच्या विशेष शाळेतील प्रतिनियुक्त कर्मचारी कार्यमुक्त करून संबंधित शाळांमध्ये वर्ग करावे या मागण्यांसाठी पुण्यात दिव्यांग बांधव एकवटलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com