Video: गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी

जळगावच्या पाचोऱ्यात शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडीचे नियोजन केले होते.

Jalgaon News: दहीहंडी दरम्यान अनेक दुर्घटना होत असतात. गोविंदा आपल्या जीवाची बाजी लावून दहीहंडीला चार चांद लावतात. पण या सगळ्यात अनेकदा त्यांना अपघाताने जीव गमवावा लागतो. जळगावच्या पाचोऱ्यात शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडीचे नियोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन चौधरी हा युवक दहीहंडी फोडताना खाली पडला. हॉस्पिटलमध्ये औषध उपचार सुरू असतानाच मृत्यूशी झुंज देत अखेर या गोविंदाची ज्योत मालवलीये. स्व. नितीन च्या जाण्याने शहरात शोककळा पसरलीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com