Video: गोविंदाने मराठीतून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्या जुहू येथील निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली.

Ganpati 2024: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील सामान्य जनतेसोबतच राजकीय नेते तसेच अभिनेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांच्या जुहू येथील निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बाप्पा घरी आणून स्थापना केली. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मनोभावे गणरायाची आरती करून सर्वांच्या सुखसमृद्धी व भरभराटीसाठी कामना केली. अभिनेता गोविंदा यांच्या घरी दीड दिवसांसाठी बाप्पाचे आगमन झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com