VIDEO: Mumbai ला पावसाचा तडाखा, शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे शासनाचे निर्देश

Mumbai Rain News: मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत, शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे निर्देश

मध्यरात्री पासून सुरु असलेल्या पावसाचा तडाखा मुंबईतील लोकल सेवा, विमान सेवा आणि वाहतुकीवर होताना पाहायला मिळत आहे. मुंबईतील पावसाचा जोर अद्यापही तसाच आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तारांबळ उडाली आहे. अशातच हवामान खात्याने मुंबईला हाय टाईडचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यरसकारकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई तसेच उपनगरातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून आता मुसळधार पावसामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन वाजता कार्यालयातून घरी सोडण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे शास्कीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com