Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरून कडाडले, VIDEO

Clash Over Freedom of Speech: जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप आणि विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे पाहायला मिळाले.

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून सांगली जिल्ह्यातील जत येथे आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार संघाच्या एका सोहळ्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून व्यासपीठावरच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले. विलासराव जगताप यांनी सध्या राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं परखड मत व्यक्त करत भाजपावर निशाणा साधला.

यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी नारायण राणे,अर्णब गोस्वामी आणि केतकी चितळेच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेली होती ? अशा शब्दात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्दा खोडून काढत फक्त एका बाजूनेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसली पाहिजे, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वतंत्र आहे,असे मत व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com