Farmers News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; शेतीला मिळणार दिवसा वीजपुरवठा!

Electricity Supply in Day Time for Farm: पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांत २७६ उपकेंद्रांसाठी एक हजार ९९१ मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा देखील माफक दरात वीज मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी एक आनंद देणारी बातमी समोर आली आहे. नवी ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तसेच कमी दरात दिवसा या ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज मिळणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी, राज्य सरकारकडून 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०' योजनेची वेगाने अंमलबजावणी केली जात आहे. पुण्यासह 5 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात या ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com