Prakash Ambedkar: सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांतील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar: सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर टीका केलीय. तसेच सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी मदत करावी. तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. सूर्यवंशींच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यासह ⁠जखमींना २५ लाख रुपयांची मदत शासनाने करावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू पोलीस कस्टडीत झाला होता. त्यामुळे हे पैसे पोलिसांकडून वसूल करावेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

भाजपच्या नेत्यांनी परभणीत भेट दिली नाही. ⁠घोरबड नावाचे पोलीस निरीक्षक यांचा आधीचा इतिहास क्रिमिनल स्वरुपाचा आहे. ⁠दोन मराठ्यातील हे भांडण आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसला आहे. त्यावर मी ठाम आहे. यासंदर्भात मी फॅक्ट फाईंडीग समिती नेमणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com