Girl Student Fee : मोठी बातमी! विद्यार्थिनींना शुल्काची सक्ती केल्यास कारवाई होणार, सरकारकडून हेल्पलाईन नंबर जारी, VIDEO

Girl Student Fee Update : विद्यार्थिनींना शुल्काची सक्ती केल्यास महाविद्यालयावर कारवाई होणार आहे. तसेच यासंदर्भातील तक्रारीचं निवारण करण्यासाठी सरकारने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

मुंबई : राज्य सरकारने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केलं आहे. यामुळे आता महाविद्यालयात विद्यार्थिनींना मुलींना शुल्क भरावे लागणार नाही. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींकडून फी वसुलीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारी निवारण करण्यासाठी सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध केला आहे.

माहिती व जनसंपर्प महासंचालनालयाने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली. 'विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाबाबात समस्या असल्यास 07969134440 आणि 07969134441 या क्रमांकावर कॉल करण्यास सांगितलं. तसेच सकाळी ९ ते ६ या वेळेत कॉल करण्याची परवानगी देण्यास आली आहे. तसेच http://helpdesk.maharashtracet.org या लाईनवरही संपर्क साधण्याचे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com