Sinhagad Missing: गौतम गायकवाडनंतर सिंहगडवर पाच मुलं बेपत्ता; पुण्यात खळबळ|VIDEO

Sinhagad Missing Kids: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेली पाच मुलं अडकली आहेत. गौतम गायकवाड बेपत्ता झाल्यानंतर पुन्हा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Summary

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पाच मुलं अडकली.

मोबाईलद्वारे व्हिडिओ करून मुलांनी नातेवाईकांना माहिती दिली.

पोलिस आणि बचाव पथक शोध मोहिमेत गुंतले.

सतत घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षेची मागणी जोर धरते आहे.

पुणे : पर्यटनासाठी सिंहगड किल्ल्यावर गेलेली पाच मुले किल्ल्यावर अडकली आहेत. या मुलांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ काढत स्वतःच्याच अडकल्याची माहिती नातेवाईकांना दिली. सध्या पोलिस आणि स्थानिक बचाव पथकाकडून मुलांचा शोध सुरू आहे.

गेल्या चार दिवसांपासून गौतम गायकवाड हा युवक सिंहगडावरून बेपत्ता होता. त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू असतानाच पुन्हा पाच मुलं सिंहगडावर अडकण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सिंहगड परिसरात पर्यटकांची वर्दळ कायम असली तरी गेल्या काही दिवसांपासून हरवणे, अडकणे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com