Ganpatrao Deshmukh: आम्हाला 500 रुपये दिले म्हणून आम्ही आलो, गणपतराव देशमुख यांच्या पत्नीचा गंभीर आरोप|VIDEO

Controversy in Sangola: सांगोल्यात भाजप रॅलीमध्ये सहभागी लोकांना ५०० रुपये देऊन आणल्याचा गंभीर आरोप रत्नाबाई देशमुख यांनी केला आहे. या रॅलीदरम्यान काही कार्यकर्त्यांनी गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकून हल्ला केला होता.

भरत नागणे, साम टीव्ही

सांगोल्यात भाजप पक्षप्रवेशेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये चक्क ५०० रुपये देऊन आणलेली माणसं होती असा आरोप दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रत्‍नाबाई देशमुख यांनी केला आहे. काल शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशादरम्यान भाजपाची शहरातून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमधील काही हूल्लडबाज कार्यकर्त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या बंगल्यामध्ये दारूच्या बाटल्या आणि दगडफेक केली होती. या घटनेचा आता सर्व स्तरातून निषेध होत आहे. या निमित्ताने घरामध्ये आत्माबाई देशमुख या एकट्याच होत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्‍नाबाई देशमुख यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

तालुक्यातील सर्वसामान्य जनता आज ही आबासाहेबांवर प्रेम करणारी आहे. ते लोक असं कधीच करू शकत नाहीत. परंतु या रॅलीमध्ये भाजपच्या काही लोकांनी पाचशे रुपये देऊन लोकांना आणले होते अशा काही लोकांकडून हे कृत्य घडले असण्याची शक्यता आहे अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ही रत्‍नाबाई देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com