VIDEO: Ganpat Gaikwad विधानपरिषद निवडणुकीसाठी करणार मतदान, गायकवाडांच्या मतदानाला काँग्रेसचा विरोध

Ganpat Gaikwad MLC News: गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले गणपत गायकवाड विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत, याचा काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात कॉंग्रेसने पत्र दिलं आहे. गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. The representation of people act मधील तरतुदी नुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही, त्यांच मत अवैद ठरु शकतं त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणामध्ये अटकेत आहेत. शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला होता. गणपत गायकवाड हे विधानपरिषद निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, याबाबतचं पत्र गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं निवडणूक आयोगाने देखील याला मंजुरी दिली होती. परंतु याला आता कॉंग्रेसकडून विरोध केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com