Video: IAS असल्याचं भासवत महिलांची फसवणूक, पुण्यात धक्कादायक प्रकार
Fake IAS Pune: आता पुण्यात आणखीन एक बनावट IAS अधिकारी धुमाकूळ घालत आहे. रेणुका ईश्वर करनुरे असे बनावट IAS अधिकाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे हिने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे देऊन दरमहा दहा रुपये टक्क्याने पैसे उकळत आहे. या प्रकरणी रेणुका विरोधात एका 31 वर्षे महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. 31 वर्षे पीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडितेने रेणुका यांना आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये परत दिले असताना सुद्धा बनावट IAS अधिकारी रेणुका हिने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी केलीये. यानंतर बनावट IAS अधिकारी रेणुका हिने धमकवण्यास सुरुवात केली. "मी IAS अधिकारी आहे माझ्या नादी लागू नको तुला कामाला लावेल, माझे पैसे तू ताबडतोब दे म्हणत धमकवण्यास सुरुवात केली". या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.