Kalyan News: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला महिलेची भररस्त्यात मारहाण; नेमकं प्रकरण काय? VIDEO

Corporator Slapped by Woman : कल्याण पश्चिम भागात एका महिलेने भर रस्त्यात शिंदेंच्या नगरसेवकाला कानफटात दिल्या आहे, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. तसेच यावर हास्यास्पद कमेंट देखील येत आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना कल्याण येथील अहिल्याबाई चौक परिसरात घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोहन उगले असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे . रविवारी काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी श्रेयवादावरून या दोघांमध्ये देखील वाद झाल्याचा पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पुन्हा या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राणी कपोते या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.याप्रकरणी शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कायद्याने महिलांना संरक्षण आहे. आत्तापर्यंत त्या महिलेला आम्ही काहीच बोललो नाही आणि बोलणार सुद्धा नाही मात्र पक्षाने अशा लोकांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी मोहन उगले यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com