VIDEO: मुंबईतील Lalbaug मध्ये आषाढ अमावस्येच्या पार्श्वभुमीवर चिकन, मटण दुकानाबाहेर खवय्यांची गर्दी

Mumbai Lalbaug Gatari News: श्रावण मास सुरु होण्याआधी आषाढ अमावस्येचं नमित्त खवय्यांची; मटण, चिकन दुकानाबाहेर गर्दी.

श्रावण मास सुरु होण्याआधीची गटारी नावाने ओळखली जाणारी आषाढी अमावस्या साजरी करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुंबईतील लालबाग येथील मटण आणि चिकन दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. आज राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गटारी साजरी करताना पाहायला मिळत आहे. पुण्यात देखील खवय्यांनी चिकन आणि मटण दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली. त्याच पाठोपाठ आता मुंबईत देखील गटारी जोरदार साजरी होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आज रविवारचा दिवस आल्यामुळे लोकांची मांसाहार दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com