VIDEO : सिंधुदुर्गात पावशी गावाला पुराचा वेढा, NDRF चे रेस्क्यू ऑपरेशन

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गातील कुडाळ शहराजवळील पावशी गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिल्यानंतर त्यातून ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी एनडीआरफ पथक घटनास्थळी पोहोचलं.

विनायक वंजारे, साम टीव्ही, सिंधुदुर्ग

मुंबई, उपनगरं आणि कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई केली आहे. तर कोकणात हाहाकार माजवला आहे. कोकणातील सिंधुदुर्गातील कुडाळ शहराजवळच्या पावशी गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. या पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकले आहेत. त्यांच्या बचावासाठी एनडीआरफचे पथक पोहोचले आहे. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते. कुडाळचे तहसीलदार वीरसिंह वसावे हे स्वतः बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com