Pune Fire News | पुण्यात अग्नितांडव! 150 वर्ष जुना पेशवेकालीन वाडा पेटला..

पुण्यातील देवरुखकर वाड्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली. ट्रॉफी बनवण्याच्या करखान्यानाला आग आगली. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आलीये. आग इतकी भीषण होती, की अगदी काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं. आगीत करोडो रुपयांचं नुकसान झाल्याची माहीती देवरुखकर वाड्याच्या मालकाने दिलीये. देवरुखकर वाडा पेशवेकालीन आहे. या वाड्यात अनेक मौल्यावान वस्तू असल्याचीही त्यांनी माहिती दिली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. घटनास्थळी तात्काळ 6 अग्नीशामक बंब दाखल झाले. अग्नीशामक दलाला 1 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com