Mumbai News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, सांताक्रूझच्या तरुणाचा जागीच मृत्यू|VIDEO

Naigaon Bike Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नायगाव हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात सांताक्रूजमधील तरुणाचा मृत्यू झाला असून दोन मित्र गंभीर जखमी आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव हद्दीत आज सकाळी दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल गुप्ता (रा. सांताक्रूज, मुंबई) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहा मित्र तुंगारेश्वर धबध्याच्या ठिकाणी फिरायला गेले होते. वसईहून मुंबईकडे परतताना नायगाव हद्दीत त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

या दुर्घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून घटनास्थळी वाहतूक पोलीस न पोहोचल्यामुळे वाहनचालकांत संतापाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com