Video: शेतकऱ्याची मुख्यमंत्र्याना उद्देशून कविता!
Kolhapur News: गेली पंधरा दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा विळखा पडला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातला पूर हळूहळू ओसरू लागलेला आहे. असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मात्र पूरस्थिती कायम आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पुरेसा पाण्याचा विसर्ग होत नसल्याने शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. या तालुक्यातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा अशी विनंती इथल्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध ही फुटला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.