Thackeray Group News : माजी आमदार Jayprakash Mundada शिंदे गटात, ठाकरेंना पुन्हा दे धक्का

माजी आमदार आणि माजी मत्री जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आणि शिंदे गटाच प्रवेश केला आहे.

माजी मंत्री आणि माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी ठाकरे गटाला राम राम केला आहे. आणि शिंदे गटात जाहीर प्रवेश घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नाही असा आरोप मुंदडा यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंदडा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या काही वर्षात आपल्याला डावलेले गेले, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता परस्पर उमेदवारी जाहीर केली म्हणून शिंदे गटात प्रवेश केल्याचे मुंदडा यांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com