Mumbai Airport VIDEO: सहा तास उलटूनही स्पाइस जेट विमानाचं टेकऑफ नाही, प्रवाशी संतापले!

Mumbai Airport News: स्पाइस जेट ची फ्लाईट रात्री २ वाजता मुंबई वरून टेक ऑफ होणार होती.

मुंबई-दुबई स्पाइस जेट ची फ्लाइट रात्री २ वाजता मुंबई वरून टेक ऑफ होणार होती, मात्र सुमारे सहा तास उलटून ही फ्लाइट नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. या विमानात सुमारे १५० ते २०० प्रवासी आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले आहे. दुसरे विमान अरेंज करेपर्यंत प्रवाशांना अजून काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले आहे, त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विमानात असलेल्या १५० ते २०० प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र विमानतळावर पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com