Gas Leakage Video : साडेतीन तास टॅंकरमधून LPG गॅस गळती, मुंबई नाशिक महामार्गावर आपत्कालीन परिस्थिती

LPG Gas leakage on Mumbai-Nashik highway : मुंबई नाशिक महामार्गावर गॅस गळती झाल्याचं समोर आलं होतं. सुमारे साडेतीन तास ही गळती सुरू होती.

मुंबई : मुंबई नाशिक महामार्गावर एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधे लिकेज झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या त्या परिस्थितीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलंय. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे येथे एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरमधे लिकेज झालं होतं. त्यामुळे आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती.काही दुर्घटना होऊ नये म्हणून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

तुर्भे येथील एलपीजी गॅस तंत्र टिम भिवंडीत दाखल झालं होतं. एकीकडे गॅस टॅंकरची गळती बंद करण्याचं काम सुरू होतं. तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनकडून गॅस टॅंकरवर पाण्याचा छडकाव केला जात होता. सुमारे साडेतीन तासानंतर गॅस टॅंकरची गळती बंद करण्यात यश मिळालं होतं. या घटनेमुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठा गोंधळ उडाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com